Anjana Krishna IPS : डॅशिंग अजितदादांना नडली दबंग लेडी सिंघम,कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा ?करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक राज्यात चर्चेत

Anjana Krishna IPS : राज्याच्या राजकारणातील डॅशिंग राजकीय नेते, प्रशासनावर धाक आणि दरारा असणारे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक दबंग महिला पोलिस अधिकारी थेट फोनवरच नडली. अजितदादा व त्या महिला अधिकाऱ्यांचा फोनवरील संवादाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे करमाळ्याच्या (karmala dysp) डिवायएसपी अंजना कृष्णा (Anjana Krishna IPS) ह्या राज्यात चर्चेत आल्या आहेत. कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा ? नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात सविस्तर! (DYSP Anjana Krishna VS)

Anjana Krishna IPS, Dashing Ajitdada was defeated by Dabangg Lady Singham, who is IPS Anjana Krishna?, Karmala DYSP news, Anjana Krishna VS,

सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या कुर्डू गावात रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन करण्यात येत आहे. या अवैध उत्खननाविरुद्ध करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (DYSP Anjana Krishna VS) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.या तक्रारींवरून अंजली कृष्णा दोन दिवसांपूर्वी कुर्डू गावात गेल्या. यावेळी काही गुंडांनी तहसीलदार, तलाठी यांना लाठ्याकाठय़ा दाखवत दमबाजी केली. या वेळी टीपर घेऊन गावकरी मोठय़ा संख्येने जमा झाले होते.

त्यानंतर DYSP अंजना कृष्णा कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.पोलिसांनी मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली होती. उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. काही लोक लाठ्या काठ्या घेऊन पोलिसांवर व अधिकाऱ्यांवर धावून गेले. त्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी केली.

घटनास्थळी मोठा राडा झाला.परंतू खमक्या आणि दबंग आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत. त्यांनी आपली कारवाई सुरुच ठेवली.पोलिसांची कारवाई सुरु असताना बाबा जगताप (baba Jagtap Ncp) या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करत कारवाईची माहिती देत सदर कारवाई थांबवण्याची विनंती केली आणि त्याने डिवायएसपी अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला.

यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा उलट सवाल केला. मग काय अजित पवारांच्या रागाचा पारा चढला. इतकी डेअरींग आहे का तुमची. कारवाई थांबवा असं अजित पवार म्हणाले.पण अंजना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. आता अंजना कृष्णा ऐकत नाही म्हटल्यावर, अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं. तेव्हा कुठे कारवाई थांबली.

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा ?

आयपीएस ह्या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता. आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या. 2023 मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची पहिलीच पोस्टींग केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाली. 2024 मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये त्यांची बदली झाली. अंजना कृष्णा सामाजिक कार्यतही सक्रीय आहेत. यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात. सध्या त्या करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्तीवर आहेत. त्यांनी या विभागाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी धडक कारवाया हाती घेतल्या आहेत. जनतेत त्या लोकप्रिय होत आहेत. करियरच्या सुरुवातीलाच अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी त्यांनी मोठा पंगा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या डेअरिंगचंही कौतूक होत आहे.

आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यात नेमका काय संवाद झाला ?

अजित पवार – मै डेप्युटी चीफ मिनिस्टर आपके साथ बात कर रहा हू. आपको आदेश देता हूं. कारवाई रूकवा दो और जाके डॉ. शेलार को बोलो की अजित पवारजी का फोन आया था.
अंजली कृष्णा – आप मेरे फोन पे डायरेक्ट कॉल करो ना…
अजित पवार – मै तेरे पे अॅक्शन लुंगा. अभी मै आपके साथ बोल रहा हू और आप मुझे डायरेक्ट कॉल करने को बोल रही है.
अंजली कृष्णा – जो आप बोल रहे हो मै समझ रही हू लेकीन…
अजित पवार – तुझे मुझे देखना है ना. एक काम करो तेरा नंबर दे दो या मुझे व्हॉट्सअॅप कॉल करो. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना.
अंजली कृष्णा – ठिक है सर…
अजित पवार – इतना आपको डेअरिंग हुआ है क्या?
अंजली कृष्णा – मैने जो कारवाई की है वो मुझे पता है. बाकी पता नही.

थेट अजित पवारांनाच भिडल्यामुळे त्या चर्चेचा विषय झाल्या आहेत. पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथेच संपला नाही. अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या. तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? तुझे डेरिंग कसे झाले.. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी ? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

याशिवाय शेतकरी संघटनेचे नेतेही अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही अजित पवारांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. महिला अधिकाऱ्याला झापलं असं बोलणं चुकीचं असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितले. एखादं काम आवडलं नाही किंवा कामात दिरंगाई केली तर अजित पवार थेट अधिकाऱ्यांना झापतात. पण या महिला अधिकाऱ्याला झापणं अजित पवारांनाच जड गेल्याचं दिसतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.