जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा प्रकोप सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. थंडीच्या लाटेमुळे पारा १० अंशाच्या खाली आल्याचे चित्र आहे. अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्याला थंडीच्या तीव्र लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
