Ahilyanagar News Today : अहिल्यानगर एलसीबीचा अवैध धंद्यांविरोधात कारवायांचा धडाका सुरुच

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ahilyanagar News Today : जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी धडक कारवाया हाती घेण्यात आल्या आहेत. एलसीबीच्या पथकाने तीन वेगवेगळ्या कारवाया केला. यामध्ये ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. १० रोजी या कारवाया करण्यात आल्या.

Ahilyanagar News Today, Ahilyanagar LCB's crackdown against illegal businesses continues, latest marathi news today,

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीमध्ये अभिषेक बाळासाहेब खाडे वय 25 वर्षे, रा. लोहगांव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा बिंगो नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती मिळताच एलसीबीने धाड टाकली त्याच्याकडून  जुगार साधने, रोख रक्कम असा एकुण 23,270/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्या विरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु. र. नं. 700/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar News Today )

शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये देविदास झुंबर मुसळे वय 51 वर्षे, रा. ढोरजळगांव, ता. शेवगांव हा विनापरवाना दारु विक्री करत असल्याचे एलसीबीच्या पथकाला आढळून आले. यावेळी केलेल्या कारवाईत 49,795/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली. आरोपी विरूध्द शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 811/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar News Today )

शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये उषाताई बाळासाहेब मुसळे रा. ढोरजळगांव, ता. शेवगांव ही महिला विनापरवाना दारु विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत  14,160/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली. सदर महिलेविरोधात शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 810/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. (Ahilyanagar News Today )

सदरची कारवाई  जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, महादेव भांड, भाग्यश्री भिटे यांचा समावेश होता. (Ahilyanagar News Today )

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. या धंद्यावर आवर घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एलसीबीकडून मोठ्या प्रमाणात कारवाया हाती घेण्यात आल्या आहेत. यामुळे अवैध व्यवसायकांचे धाबे दणाणून गेले आहेत.

दरम्यान एलसीबीने जामखेड तालुक्यातही मोठी कारवाई केली. खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील जातेगांव शिवारातील जुगार अड्ड्यावर छापेमारी करून ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.