Nepal Live : राष्ट्रपतींचे घर जाळले,संसद पेटवली, न्यायालयात जाळपोळ, मंत्र्यांच्या घरांवर हल्लाबोल, पंतप्रधान देश सोडून जाणार? नेपाळमध्ये भडका का उडाला ? वाचा सविस्तर

Nepal latest news today : भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा भडका उडाला आहे. संतप्त तरूणाईने सरकार विरोधात आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे. अंदोलकांनी राष्ट्रपतींचे घर जाळून टाकले आहे तसेच संसद पेटवून दिलीय, त्याचबरोबर न्यायायालयात प्रचंड जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच कडेकोट सुरक्षा असतानीही मंत्र्यांच्या घरांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. आता ते देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

Nepal live, President's house burnt, Parliament set on fire, court arson, ministers' houses attacked, Prime Minister to leave country, why did riots break out in Nepal? Read in detail,

सोशल मीडियावर घातलेली बंदीनेपाळ सरकारला चांगली भोवली आहे. या निर्णयाविरोधात सोमवार, ८ सप्‍टेंबरपासून काठमांडूमधील तरुणाई रस्‍त्‍यावर उतरली. या आंदोलनास हिंसक वळणही लागले, अखेर आज (दि.९) पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या हिंसक आंदोलनामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला असून, डझनभर लोक जखमी झाले आहेत.

Nepal live, President's house burnt, Parliament set on fire, court arson, ministers' houses attacked, Prime Minister to leave country, why did riots break out in Nepal? Read in detail,

राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर कब्जा केला, तोडफोड केली आणि आग लावली. तसेच संसद पेटवून देण्यात आली आहे.

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कर्फ्यू जाहीर केला. मात्र त्यानंतरही हजारो तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांनी सुरुवातीला अनेक मंत्र्यांची निवासस्थाने जाळली. त्यानंतर या तरुणांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या खाजगी निवासस्थानांवर कब्जा करून त्यांना आग लावली आहे.

संतप्स आंदोलकामनी नेपाळी काँग्रेसचे केंद्रीय कार्यालय पेटवले, त्यानंतर संसद भवनालाही आग लावली आहे. आता संसद जळत आहे. या ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणीही नाही.

Nepal live, President's house burnt, Parliament set on fire, court arson, ministers' houses attacked, Prime Minister to leave country, why did riots break out in Nepal? Read in detail,

हिंसाचारानंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला, तर परिस्थिती चिघळल्याने लष्कराने संसदेजवळील रस्त्यांचा ताबा घेतला आहे.

नेपाळमध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब का उसळला?

नेपाळ सरकारने ४ सप्‍टेंबर २०२५ रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब आणि ‘एक्स’सह तब्बल २६ सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली. या निर्णयाविरोधात सोमवार, ८ सप्‍टेंबर रोजी देशभरातील तरुणाई रस्‍त्‍यावर उतरली. नेपाळमध्ये अनेक वर्षांनंतर सर्वात मोठे युवा आंदोलन झाले आहे. यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तातडीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर दळणवळणमंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी समाजमाध्यम मंच पूर्ववत सुरू केले जातील, अशी घोषणा केली. यानंतरही आंदोलक पंतप्रधान ओली यांनी राजीनामा द्‍यावा या मागणीवर ठाम होते. अखेर त्‍यांनी राजीनामा दिला आहे.

सोशल मीडियावरील बंदी उठवूनही आंदोलन सुरुच

नेपाळमध्ये केवळ पंतप्रधानाच्या राजीनाम्याने सरकार कोसळत नाही. पंतप्रधान हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात, तर राष्ट्रपती राम चंद्र पौडेल हे सरकारचे प्रमुख आहेत. दरम्‍यान, नेपाळची राजधानी काठमांडूमध्‍ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो तरुण-तरुणी, ज्यांनी आपल्या आंदोलनाला ‘जनरेशन झेड आंदोलन’ असे नाव दिले आहे, त्यांनी सार्वजनिक जागा ताब्यात घेतल्या आणि पोलिसांसोबत जोरदार संघर्ष केला. संपूर्ण शहरभर काळ्या धुराचे लोट पसरले होते. रस्त्यांवर जाळलेल्या गाड्या आणि ट्रक पडलेले होते.

Nepal live, President's house burnt, Parliament set on fire, court arson, ministers' houses attacked, Prime Minister to leave country, why did riots break out in Nepal? Read in detail,

आंदोलकांनी पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या खासगी निवासस्थानांच्या भिंती आणि दरवाजे ओलांडून आत प्रवेश केला, खोल्यांना आग लावली आणि तेथील चित्रांची तोडफोड केली.या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, नेपाळी सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवूनही आंदोलन थांबले नाही. शहरातील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले होते, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही सेवा ठप्प झाल्या आहेत.

लष्कराला करण्‍यात आले पाचारण
पोलिसांना हिंसाचार नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले. स्थानिक वृत्तसंस्था ‘द काठमांडू पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप राजीनामा न दिलेल्या किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून दूर असलेल्या सरकारी सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Nepal live, President's house burnt, Parliament set on fire, court arson, ministers' houses attacked, Prime Minister to leave country, why did riots break out in Nepal? Read in detail,

नेपाळमधील सरकार जेन झी आंदोलनानंतर पुर्णपणे कोसळले असून देशात मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे.(Nepal Gen Z Protest Violence) नेपाळमधील जेन झी आंदोलनाचा मुख्य चेहरा आता समोर आला आहे.(Nepal Gen Z Protest Violence) जेन झी आंदोलनाने नेपाळमधील सरकार पुरतं कोसळलं असून जेन झी आंदोलकांचा मुख्य नेता सुदान गुरुंग यांचे नाव आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय सुदान गुरुंग हा जेन झी आंदोलनकर्त्यांचा नेता आहे.(Nepal Gen Z Protest Violence)

दरम्यान, नेपाळमधील जेन झी आंदोलन नेमकं कोणी उभारले?, कोणी इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांना रस्त्यावर उतरवले?, याबद्दल आता खुलासा झाला आहे. सुदान गुरुंग हा हामी नेपाल या संघटनेचा अध्यक्ष आहे. सुदान गुरुंग यांनीच नेपाळमधील तरुणांना सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशात अराजक माजल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अन्य मंत्र्यांनादेखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.(Nepal Gen Z Protest Violence)

जेन झी आंदोलन का झाले?
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर निर्बंध आणल्यानंतर देशभरात जेन झी कडून आंदोलन करण्यात आले. या हिंसक आंदोलनामुळे देशात मोठी राजकीय उलथापालथ घडून आली. दरम्यान, सरकारने फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्युब व एक्ससह एकूण २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर या निर्णयाविरोधात तरुण रस्त्यावर उतरले. यात जेन-झी(Gen Z)(Nepal Gen Z Protest Violence) पिढीतले तरुण-तरुणी यात आघाडीवर होते.

आंदोलनानंतर अवघ्या काही तासांत नेपाळमधील सरकारची पिछेहाट झाली आणि त्यांनी समाजमाध्यमांवरील बंदीचा निर्णय मागे घेतला. तरुणांनी आंदोलनाचा परिणाम असा झाला की, सरकारला समाजमाध्यमांवरील बंदी मागे घ्यायला लावलीच त्याचबरोबर, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह चार मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.(Nepal Gen Z Protest Violence)