indian viral videos : विदेशी पर्यटक भारतातील पर्यटनस्थळी उचलतोय कचरा, भारतीय पर्यटकांचा बेजबाबदारपणा पुन्हा ऐरणीवर, हिमाचल प्रदेशातील धबधब्याजवळचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत !

कांगडा, हिमाचल प्रदेश | indian viral videos : हिमाचल प्रदेशातील कांगडा (Kangra, Himachal Pradesh) जिल्ह्यातील एका धबधब्याजवळचा व्हिडीओ (Waterfall Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक विदेशी पर्यटक (Foreign tourists) प्लास्टिकचा कचरा (garbage) उचलताना दिसतोय, तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहत उभे आहेत. ही कृती पाहून अनेकांनी भारतीय पर्यटकांच्या बेजबाबदार वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. (Videos Viral)

videos viral, Kangra Himachal Viral Video, Foreign tourists picking up garbage at tourist spots in India, video near waterfall in Himachal Pradesh is trending on social media,

एक परदेशी नागरिक पर्यावरण जपतोय, आणि आपण मात्र निसर्गाची नासाडी करतोय,” असा सूर समाज माध्यमांवरील प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचा होता. व्हिडीओमध्ये दिसणारा पर्यटक म्हणतो, “कदाचित एखाद्या दिवशी मी मोकळा असेल, तर मी लोकांना सांगेल, ‘हे उचला’. मला काहीच वाटत नाही लोकांना सांगायला.” (Kangra Himachal Viral Video, indian viral videos,)

Kangra Himachal Viral Video : समाजमाध्यमांवर संतापाचा उद्रेक

या व्हिडीओला हजारो लोकांनी शेअर केलं असून, अनेकांनी भारतीय पर्यटकांच्या वागणुकीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलंय, “प्रशासन काही करु शकत नाही, लोकांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. ही मानसिकतेची गोष्ट आहे.” (indian viral videos,)

आणखी एका युजरने लिहिलं, “स्वच्छ भारत अभियान, दंड, डस्टबिन काहीही असो, जोपर्यंत लोक स्वतःला बदलत नाहीत, तोपर्यंत आपला देश स्वच्छ होणार नाही.” (indian viral videos,)

पर्यटनस्थळी कचऱ्याचा प्रश्न गंभीर

देशभरातील अनेक पर्यटनस्थळी हीच समस्या दिसून येते. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी असले तरी लोकांची बेजबाबदार वृत्ती हा खरा अडथळा आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, अन्नपदार्थ, कागद यांचा ढीग बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतो. (Kangra Himachal Viral Video)

स्थानिक प्रशासन वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवत असले तरी समस्या मुळातून सुटत नाही. कारण ही समस्या व्यवस्थेची नसून मानसिकतेची आहे. (Kangra Himachal Viral Video)

जबाबदारीची जाणीव आवश्यक

या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालंय की देश स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी मोहिमांवर अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर जबाबदारी घेतली पाहिजे. (Kangra Himachal Viral Video)

एक विदेशी पर्यटक जिथे स्वच्छतेसाठी पुढाकार घेतो, तिथे आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला हवा – “आपण काय देतोय आपल्या देशाला?” (indian viral videos,)