Longest Serving PM of India : नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम, सलग 4,078 दिवस, Narendra Modi ठरले दुसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान !

नवी दिल्ली, २५ जुलै २०२५ : Longest Serving PM of India : भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू ( Pandit Jawaharlal Neharu) यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केले आहे. त्यांच्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा दुसरा क्रमांक लागत होता. (longest serving pm of india) परंतू आता पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi) यांनी ४,०७८ दिवस पंतप्रधानपद सांभाळत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे. भारताचे सलग दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरले आहेत. (2ND Longest Serving Prime Minister in India)

Longest Serving PM of India, Longest Serving Prime Minister in India , Narendra Modi created history by breaking Indira Gandhi's record, Narendra Modi, who led the Prime Ministership for 4,078 consecutive days, became the second Longest Serving PM of India,

२०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातली काँग्रेस पक्षाची सत्ता उध्वस्त केली होती. त्यावेळी भाजपने २७२ जागा जिंकल्या आणि पहिल्यांदा बहुमताचे सरकार बनवले. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपने आपली कामगिरी सुधारली आणि ३०३ जागा मिळवल्या. तर २०२४ मध्ये मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, परंतू एनडीएच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा भाजपने केंद्रात सरकार स्थापन केले. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. longest serving pm of india

Longest Serving PM of India : नरेंद्र मोदी किती दिवसांपासून पंतप्रधान आहेत?

आज २५ जुलै रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी काम करत असताना ४०७८ दिवस पुर्ण केले. यापुर्वी हा विक्रम माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर होता. इंदिरा गांधी यांनी आपल्या सत्ताकाळात ४०७७ दिवस पंतप्रधान म्हणून कारभार केला होता. त्यांचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी आज मोडला आणि नवा इतिहास रचला. मोदी यांनी ४,०७८ दिवस पंतप्रधानपद सांभाळत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला. (Longest Serving Prime Minister in India)

Longest Serving Prime Minister in India : इंदिरा गांधी किती वर्षे पंतप्रधान होते?

इंदिरा गांधी यांनी दोन टप्प्यांत पंतप्रधानपद सांभाळले होते — पहिला कालावधी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ आणि दुसरा १४ जानेवारी १९८० पासून ते त्यांच्या हत्येपर्यंत म्हणजेच ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ४,०७७ दिवस पंतप्रधानपद सांभाळले होते. (Longest Serving PM of India)

पंडित जवाहरलाल नेहरू किती वर्षे पंतप्रधान होते?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदावर राहिलेले नेते आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ पासून २७ मे १९६४ पर्यंत एकूण १६ वर्षे आणि २८६ दिवस देशाचे नेतृत्व केले. (Longest Serving Prime Minister in India)

तसेच, नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी (१९७१) यांच्यानंतर पहिले असे पंतप्रधान आहेत जे सत्तेत असताना पुन्हा बहुमतासह निवडून आले. नेहरू यांच्यानंतर सलग तीन लोकसभा निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखाली जिंकणारे एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. (Longest Serving PM of India)

मोदी किती वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते?

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २००१ ते २०१४ या काळात सलग १३ वर्षे काम पाहिले. गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ते नेते आहेत.

Longest Serving PM of India, Longest Serving Prime Minister in India , Narendra Modi created history by breaking Indira Gandhi's record, Narendra Modi, who led the Prime Ministership for 4,078 consecutive days, became the second Longest Serving PM of India ,

“ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आणि एकमेव असे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत ज्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले आणि तिसर्‍यांदा लोकसभा निवडणुका जिंकल्या. पुन्हा ते सत्तेवर आले. गैर-काँग्रेस पक्षाकडून स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळवणारे ते एकमेव नेते आहेत. (Longest Serving PM of India)

भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक काळ सत्तेवर ठेवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मोदी यांच्या करिष्यामुळे देशात काँग्रेसच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या राजवटीला सुरुंग लागला. देशात सध्या भाजप जोमात आहे,तर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे” (Longest Serving PM of India)