केंद्र सरकारची मोठी कारवाई : अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेट प्रसारित करणाऱ्या Ullu ALTT सह 25 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी, जाणून घ्या संपूर्ण यादी !

नवी दिल्ली : इंटरनेट सध्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म झपाट्याने लोकप्रिय होत आहे. परंतू या प्लॅटफॉर्मवर अश्लील व आक्षेपार्ह कंटेट प्रसारित होत असल्याने हे ओटीटी प्लॅटफॉर्म सतत वादाच्या भोवर्‍यात सापडत आहेत. देशात अनेकदा मोठा गदारोळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Ullu, ALTT सह 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

Central government's big action, 25 OTT platforms including Ullu ALTT banned for broadcasting obscene and offensive content, know the complete list,

भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ओटीटी माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अश्लील व विकृतीजन्य कंटेंटवर कारवाई करत उल्लू, ALTT, हुलचुल, बिग शॉट्स यांसारख्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. या बंदीच्या निर्णयात ‘हाऊस अरेस्ट’ या वादग्रस्त शोचं उदाहरण विशेषतः अधोरेखित करण्यात आलं आहे.

उल्लू प्लॅटफॉर्मवरील ‘हाऊस अरेस्ट’ हा शो मे २०२५ मध्येच वादात सापडला होता. या शोमध्ये अभिनेता अजाज खान याने महिला स्पर्धकांना लैंगिक मुद्यांवर प्रश्न विचारल्याचे, तसेच काही स्पर्धकांना अंगलट आणणारे ‘चॅलेंज’ दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने अजाज खान व उल्लूचे संस्थापक विभू अगरवाल यांना समन्स बजावले होते.

दुसऱ्यांदा नियम तोडल्यामुळे बंदी

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित प्लॅटफॉर्मना सप्टेंबर २०२४ मध्येच इशारा देण्यात आला होता. डिजिटल पब्लिशर कंटेंट ग्रीव्हन्स कौन्सिल (DPCGC) या स्वयं-नियामक संस्थेने देखील या प्लॅटफॉर्मवर १०० पेक्षा अधिक वेबसीरिज हटवण्याचा आदेश दिला होता. मात्र, काही वेळानं हटवलेला कंटेंट परत अनएडिट स्वरूपात अपलोड केला जात असल्याचा आरोप आहे. यामुळे “सतत नियम पायदळी तुडवणे” असा ठपका या प्लॅटफॉर्म्सवर ठेवण्यात आला आहे.

सरकारचा स्पष्ट इशारा

सरकारने ओटीटी माध्यमांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार सहन केला जाणार नाही. जर सामाजिक मूल्यांचा, महिलांच्या प्रतिष्ठेचा व कायद्याचा भंग होत असेल, तर कठोर पावले उचलली जातील.

सरकारने कोणत्या कायद्यांतर्गत ओटिटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली ?

  1. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act 2000)
    कलम 67: अश्लील सामग्री ऑनलाइन प्रसारित करणे गुन्हा.
    कलम 67A: सेक्सुअली एक्सप्लिसिट (अत्यंत अश्लील) कंटेंटचा प्रसार अधिक गंभीर गुन्हा.
    कलम 79(3)(b): जर प्लॅटफॉर्मला चुकीचे कृत्य समजूनही कारवाई केली नाही, तर संरक्षण काढून घेतले जाऊ शकते.
  2. IT नियम, 2021 (डिजिटल मीडिया आचारसंहिता)
  3. भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS 2023)
    कलम 294
  4. स्त्री अश्लील सादरीकरण प्रतिबंध अधिनियम, 1986 कलम 4 : जाहिरात, चित्रफीत, मजकूर यांतून स्त्रियांचे लैंगिक शोषण किंवा अवमानकारक सादरीकरण करणं बेकायदेशीर.

भारत सरकारने बंदी घातलेले २५ ओटीटी प्लॅटफॉर्म्स कोणते ? जाणून घ्या संपुर्ण यादी

  1. उल्लू (Ullu)
  2. एएलटीटी (पूर्वीचे ALTBalaji)
  3. देशीफ्लिक्स (Desiflix)
  4. हुलचुल अ‍ॅप (Hulchul App)
  5. बिग शॉट्स (Big Shots)
  6. प्राईम प्ले (Prime Play)
  7. रॅबिट मुव्हीज (Rabbit Movies)
  8. वु‍व्ही (Voovi)
  9. मूडएक्स (MoodX)
  10. निऑनएक्स व्हीआयपी (NeonX VIP)
  11. न्यूफ्लिक्स (Nuefliks)
  12. किंडीबॉक्स (KindiBox)
  13. ड्रीम्स फिल्म्स (Dreams Films)
  14. फ्लिझ मुव्हीज (Fliz Movies)
  15. एक्सप्राईम (XPrime)
  16. येस्मा (Yessma)
  17. चिकूफ्लिक्स (Chikooflix)
  18. बेशरम्स (Besharams)
  19. बूम मुव्हीज (Boom Movies)
  20. अनकट अड्डा (Uncut Adda)
  21. हॉट एमएक्स (Hot MX)
  22. लोकल सिनेमा (Local Cinema)
  23. नॉटी फ्लिक्स (Naughty Flix)
  24. मोजफ्लिक्स (Mojflix)
  25. ट्रिफ्लिक्स (Triflicks)