जामखेड तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, बावीत दोन ठिकाणी घरफोडी, ७२ हजाराचा मुद्देमाल लंपास, पोलिस तपास सुरू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बावी गावातून घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ७२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना ११ रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी १२ रौजी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thieves break into houses in Jamkhed taluka, burglary at two places in Bavi, valuables worth Rs 72 thousand stolen, police investigation underway

जामखेड तालुक्यातील बावी येथील अभिजित भास्कर निकम व अभिमान मोहन पवार यांच्या घरी घडफोटीची घटना ११ रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत अभिजित निकम यांच्या घरातील ६२ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व रोख १० हजार असे एकुण ७२ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी निकम यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

जामखेड तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.