धक्कादायक ! जामखेड शहरातील तरूण व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवले जीवन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बकर्‍याचा व्यापार करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरूणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना ३० रोजी सायंकाळी उघडकीस आली. आकाश रतन जाधव असे मयत तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Shocking, young businessman from city took an extreme step, ended his life by hanging himself, Akash Ratan Jadhav Jamkhed,

जामखेड शहरातील कान्होपात्रानगर येथील आकाश रतन जाधव हा तरूण गेल्या काही वर्षांपासून बकऱ्यांचा व्यवसाय करायचा.  सोमवारी दुपारी आकाश जाधव हा बाहेरून घरी आला. तो आपल्या घरातील पहिल्या मजल्यावर गेला. तिथे त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी ५ च्या सुमारास त्याचे नातेवाईक घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आकाश जाधव याने आत्महत्या का केली ? याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.