जामखेड : 1 लाख 28 हजार रूपयांचे गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश, पीआय दशरथ चौधरी यांच्या पथकाची कामगिरी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । जामखेड शहर व परिसरातील नागरिकांचे वेगवेगळ्या कारणांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सचा शोध लावण्यात जामखेड पोलिसांना मोठे यश आले आहे. जामखेड पोलिसांनी 1 लाख 28 हजार रूपये किमतीचे गहाळ मोबाईल शोधून ते मुळ मालकांना परत केले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या टीमने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जामखेड शहरातील सुरज मानिक पवार, रा. कान्होपात्रा गल्ली जामखेड, कृष्णा शहाजी बोराटे, रा. बोराटेवस्ती जामखेड,अशोक सखाराम मँदड, रा. अहिल्यानगर वस्ती जामखेड, नवनाथ विलास बिरंगळ, रा. सोनेगाव, अतुल सावता मोहळकर, रा. नान्नज, सुनिल रामा फुलमाळी, रा. नान्नज, सोनु कुंदन वाघमारे, रा. आरोळेवस्ती जामखेड, या नागरिकांचे विविध कारणांनी मोबाईल फोन गहाळ झाले होते. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या होत्या.

या तक्रारींचा तपास करण्यासाठी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या गहाळ मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळवले. आज २३ रोजी पोलिसांनी मिळालेले मोबाईल मुळ मालकांच्या ताब्यात दिले.
तपासात मिळालेल्या मोबाईलची माहीती खालील प्रमाणे.
- २०,००० /- रू किं चा One+ nordCE२-५G कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय.नं. ८६३८२५०६६७९५७५४.
- ३०,००० /- रू कि चा Vivo V२३१२ कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय. नं. ८६५६३९०६७३३७३७७
- १५,००० /- रू कि चा Oppo k १२ x कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय.नं. ८६६०४७०७३०९०१५५
- १४,००० /- रू कि चा Vivo Y२१ कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय. नं. ८६२८२२०५५४६३२०६
- १५,५०० /- रू कि चा Vivo Y २९ कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई. आय. नं. ८६६४२३०७५१६७१५२
- १३,००० /- रू कि चा Vivo Y२० कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय. नं. ८६३९७९०५०५८१२७२
- २१,००० /- रू कि चा Vivo V२० कंपनीचा मोबाईल त्याचा आय.एम.ई.आय. नं. ८६८३२६०५५०४१७८४
- सर्व मोबाईल एकुण किंमत १ लाख २८ हजार ५००
सदरची कारवाई पोलीस अधिक्ष सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,पोलिस काँस्टेबल देविदास पळसे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलिस काँस्टेबल नितीन शिंदे यांनी केली. जामखेड पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.