जामखेड: वाघा येथे घरफोडी, ४ लाखांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील वाघा येथे घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

House burglary in Wagha, valuables worth Rs 4 lakh looted, case registered against unknown thief, jamkhed news today,

जामखेड तालुक्यातील वाघा येथील अकाश रामदास बारस्कर हे आपल्या आई वडील व कुटूंबासह घरात झोपलेले असताना त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूम व किचनमधील सामानाची उचकापाचक करून सोने चांदीचे रोख रक्कम असा ३ लाख ९६ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांनी हाॅल आणि किचनचा दरवाजा बंद केला होता. फिर्यादीचे वडील लघुशंकेसाठी पहाटे उठल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला.अकाश रामदास बारस्कर (आयटी इंजिनिअर ) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.