जामखेड : जवळकेत श्रद्धास्थानाच्या विकासाला आरंभ, सभापती राम शिंदे यांच्या हस्ते सटवाई देवी मंदिर परिसरात 3 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळके येथील सटवाई देवी मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून विकासाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. सटवाई देवी यात्रोत्सवाचे औचित्य साधून सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाले. 3 कोटी रूपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि देवीभक्तांचा उत्साह व जल्लोष यावेळी पहायला मिळाला.

राज्यातील हजारो भाविकांचे हे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सटवाई देवी मंदिर परिसराचा पर्यटन विभागाकडून विकास व्हावा आणि त्यामाध्यमांतून सदरचे तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या नकाशावर यावे यासाठी विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. शिंदे यांनी पर्यटन विभागाकडे परिपूर्ण आराखडा सरकारकडे सादर करत सन २०२३-२४ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ०३ कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला होता.

याच निधीतून श्रीक्षेत्र सटवाई देवी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभामंडप, पेव्हिंग ब्लॉक, पाण्याची टाकी, संरक्षक भिंत, शौचालय, जोडरस्ते सह आदी कामे केली जाणार आहेत. या कामांचा शुभारंभ ११ ऑगस्ट रोजी विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी जवळके ग्रामस्थ आणि देवीभक्तांनी प्रा शिंदे यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केले. सटवाई देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी भरीव निधी मंजुर केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रा शिंदे यांचे आभार मानत त्यांचा नागरी सत्कार केला. यावेळी गावातील महिला भगिनींनी लाडक्या रामभाऊला राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

आज सटवाई मातेच्या पावन यात्रोत्सवात सहभागी झालो. भक्तिभावाच्या वातावरणात सटवाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सटवाई माता मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाअंतर्गत मंजूर झालेल्या ३ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि अपेक्षित असलेल्या सुविधांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमुळे भाविकांना धार्मिक कार्यांसाठी अधिक सोयीस्कर व सुसज्ज वातावरण मिळेल, तसेच ग्रामस्थांसाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील अशी भावना यावेळी प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी सार्वजनिक बांधकामचे शशिकांत सुतार, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, जयराम खोत, उदय पवार, महालिंग कोरे, सरपंच सुभाष जायभाय, बाळासाहेब गोपाळघरे, महेश बांगर, संतोष पाटील, बब्रुवान तात्या वाळुंजकर, पृथ्वीराज वाळूंजकर, सुग्रीव वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, दत्तात्रय माने, एकनाथ वाळुंजकर, भीमराव (बापु) माने, नवनाथ वाळुंजकर, बलभीम जाधव, अप्पासाहेब घोलप, बापू बोराडे, राधाकृष्ण वाळुंजकर, हनुमंत बोराडे, बाळराजे माने, गणेश चव्हाण, प्रदीप बोराडे, कैलास डमरे, किशोर साळवे,गणेश घोलप गोवर्धन महारणवर, सर्जेराव जाधव, गोरख वाघ, ज्ञानू माने, भारत मंडलीक, विनोद माने संतोष मंडलिक, लहानजी वाळुंजकर नवनाथ बोराडे, अंगद वाळुंजकर,धर्मा डमरे, हनुमंत दळवी, बाळू वाळुंजकर, दत्ता माने, दत्ता वाळुंजकर, विलास वाळुंजकर,अभिमान बोराडे, सह आदी प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
