जामखेड : सभापती प्रा राम शिंदे यांच्यावतीने चोंडीतील विद्यार्थ्यांना तिरूपती बालाजी मंदिराच्या प्रसादाचे वाटप !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उत्साहवर्धक आणि भक्तीमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी चोंडीतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी भेट दिली आहे.

प्रा. शिंदे यांच्या पुढाकारातून आज श्री क्षेत्र चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी विशाल शिंदे,पांडुरंग उबाळे, मिलिंद देवकर, आप्पासो उबाळे, अभिमन्यू सोनवणे, कल्याण शिंदे, दिनेश शिंदे, बिभिषण भांडवलकर, नवनाथ भांडवलकर, आलेश शिंदे, आनंद शिंदे, सुजित शिंदे, शंकर शिंदे, राजु टकले, विशाल बिभिषण शिंदे, संदिप खरात हे उपस्थित होते.
