धक्कादायक : खाजगी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू, डॉ प्रकाश ओमासे विरोधात ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, फक्राबाद ग्रामस्थांनी केली कठोर कारवाईची मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खाजगी डाॅक्टरने (Doctor) केलेल्या हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू (Death of six-year-old girl) झाला आहे. ही धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील फक्राबाद (Fakrabad Jamkhed) येथून उघडकीस आली आहे. डाॅक्टरने चुकीचे निदान (Misdiagnosis) करत मुलीवर चुकीचे औषधोपचार (wrong treatment) केले, तसेच उपचारात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मयत मुलीच्या कुटूंबियांकडून करण्यात आला आहे.संबंधित दोषी डाॅक्टरविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी मयत मुलीच्या कुटूंबियांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. डाॅक्टरच्या निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा यामुळे एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस येताच जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित दोषी डाॅक्टरवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मयत मुलीचे नातेवाईक व फक्राबाद ग्रामस्थ यांनी जामखेडच्या प्रांताधिकारी सायली सोळंके (Sayali Solanke) व जामखेड पोलिस स्टेशन येथे शुक्रवारी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, २५ जूलै २०२३ रोजी फक्राबाद येथील प्रांजल अर्जुन सातव (Pranjal Arjun Satav) या सहा वर्षीय चिमुकल्या मुलीला सर्दी खोकला व पोट दुखत असल्यामुळे फक्राबाद येथील शिवम हॉस्पीटल (Shivam Hospital Fakrabad) येथे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी शिवम हाॅस्पीटलचे संचालक डॉ. प्रकाश ओमासे (dr Prakash Omase) यांनी प्रांजल हिची वैद्यकीय तपासणी केली. उपचार सुरू करण्यापुर्वी काही टेस्ट करण्यास सांगितल्या.टेस्ट केल्यानंतर तीन दिवसाचा कोर्स करण्यास सांगितले. उपचार सुरू असताना सदर मुलीची शारीरीक स्थिती चांगली होती. परंतू पहिल्या दिवसाच्या ट्रिटमेंटनंतर डॉक्टरने तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. तिच्या उपचारावर गांभीर्याने स्वता: लक्ष न देता दवाखान्यात कामाला असलेल्या अशिक्षित (अप्रशिक्षित) स्टाफला तिच्या उपचाराची जबाबदारी दिली.

Shocking, Six-year-old girl dies due to carelessness of private doctor, Villagers aggressive against doctor prakash omase , Fakhrabad villagers demand legal action,

“डॉक्टर प्रकाश ओमासे यांच्या चुकीच्या निदानामुळे, चुकीच्या उपचारामुळे तसेच दुर्लक्षामुळे दुसऱ्या दिवशी प्रांजल हिची प्रकृती खालावली. तिची प्रकृती गंभीर झाल्यावर डाॅ प्रकाश ओमासे यांनी उपचारासाठी तातडीने हालचाली करणे आवश्यक होते. परंतू धक्कादायक बाब म्हणजे मुलीवर उपचार करण्याऐवजी सदर डॉक्टरने दवाखान्यातून पळ काढला. अप्रशिक्षित (अशिक्षित) स्टाफला फोनवरून सुचना देत मुलीवर उपचार करण्यास सांगितले. डॉक्टरच्या सांगण्यावरून स्टाफने मुलीवर ट्रीटमेंट केली. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी तिची प्रकृती नाजूक बनली. मुलीची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे मुलीचे आई वडील डॉक्टरशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र डाॅक्टर दवाखान्यात फिरकला नाही.उलट मुलीला उपचारासाठी जामखेडला घेऊन जाण्यास सांगितले.”

सदर मुलीस उपचारासाठी जामखेडला हलवले जात असताना डाॅक्टर प्रकाश ओमासे हे दवाखान्यात उपस्थित असणे आवश्यक होते. तिला नेमके काय झालेय हे तिच्या आई वडिलांना सांगणे आवश्यक होते.परंतू तसे घडले नाही. शिवाय पेशंटला जामखेडला घेऊन जाताना हाॅस्पीटलने भरलेले ऑक्सीजन सिलेंडर देण्याऐवजी मोकळे सिलेंडर दिले. पेशंटला जामखेडच्या शिंदे हाॅस्पीटलला नेण्यास सांगितले. परंतू तिथे नेल्यानंतर डाॅक्टरांनी तिथे दाखल करुन घेतले नाही. अहमदनगरला घेऊन जाण्यास सांगितले. ॲम्बुलन्सने अहमदनगरला घेऊन जात असतानाच प्रांजल हिचा वाटेतच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २७ जूलै २०२३ रोजी घडली.

Shocking, Six-year-old girl dies due to carelessness of private doctor, Villagers aggressive against doctor prakash omase , Fakhrabad villagers demand legal action,

फक्राबाद येथील शिवम हॉस्पीटलचे डाॅक्टर प्रकाश ओमासे यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा तसेच चुकीचे निदान, चुकीची औषधोपचार पद्धती आणि अप्रशिक्षित (अशिक्षित) स्टाफमुळे सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबासह फक्राबाद ग्रामस्थांनी केला आहे.

डाॅ प्रकाश ओमासे (Doctor prakash omase) या डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे अनेकांचे आतापर्यंत प्राण गेले आहेत अशी चर्चा नेहमी होते, आता फक्राबाद येथील प्रांजल अर्जुन सातव या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषी डाॅक्टरवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, सदर डाॅक्टरचा वैद्यकीय परवाना तातडीने रद्द करावा, याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, सदर कारवाई न झाल्यास हॉस्पिटल व डॉक्टरला जमावाकडुन काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Shocking, Six-year-old girl dies due to carelessness of private doctor, Villagers aggressive against doctor prakash omase , Fakhrabad villagers demand legal action,

सदर निवेदन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर यांना पाठविण्यात आले आहे.

या निवेदनावर मयत मुलीचे वडील अर्जुन महादेव सातव, मयत मुलीची आई सुजाता अर्जुन सातव, वैशाली महादेव सातव, विशाल महादेव सातव, महादेव विठोबा सातव, सुखदेव विठोबा सातव, विजय सुखदेव सातव, अजय सुखदेव सातव, आयोध्या सुखदेव सातव, गणेश सातव, भरत सातव, बाबासाहेब सातव, किशोर सातव, स्वप्नील सातव, महादेव राऊत, अशोक राऊत, अरविंद राऊत, सह आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.