जामखेड : अतिवृष्टीचा फटका, वांजरा नदीवर ग्रामस्थांनी उभारलेला लोखंडी पुल खचला, कडभनवाडी व कवडवाडीचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सलग दोन जामखेड तालुक्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. बालाघाटात पावसाचे रौद्ररूप पहायला मिळाले. या भागातुन वाहणार्या वांचरा नदीला मोठा पुर आल्याने कडभनवाडी व कवडवाडी या दोन गावांना जोडणारा लोखंडी पुल खचला आहे. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जामखेड तालुक्यातील कडभनवाडी व पाटोदा तालुक्यातील कवडवाडी या दोन्ही वाड्या वांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत.कडभनवाडी येथील नागरिकांनी नदीवर स्वखर्चातून लोखंडी पुल उभारला होता. मात्र अतिवृष्टीत हा पुल खचलाय. तसेच पत्रा पुर्णपणे वाकला आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दोन्ही वाड्याचा संपर्क तुटला आहे.
दोन्ही वाड्यांमधील नागरिकांच्या शेतजमिनी ऐकमेकांच्या वाड्यांमध्ये आहेत. यामुळे शेतकर्यांना दररोज नदी ओलांडावी लागले.परंतू सध्या नदीवरील लोखंडी पुल खचलाने शेतकऱ्यांना आपल्या रानात जाता येता येत नाही.

कडभनवाडी ही अहिल्यानगर जिल्ह्यात तर कवडवाडी बीड जिल्ह्यात आहे. दोन्ही वाड्या आपापल्या जिल्ह्यातील शेवटचे टोके आहेत. दोन्ही वाड्या मधुन वांजरा नदी वाहते.
महासांगवी प्रकल्प जुलै महिन्यातच पुर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे पाण्याचा फुगवटा दोन्ही वाड्याच्या मागे जातो यामुळे दोन्ही वाड्या संपर्क होत नाही.
शेतकरी वर्गाला ये जा करण्यासाठी कडभनवाडी च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणी करत लोखंडी पुल उभारला होता. यामुळे नदीला पाणी असले तरी लोखंडी पुलावरून ये जा करता येत होती. पण आता लोखंडी पुल खचल्या मुळे दोन्ही वाड्या चा संपर्क तुटला आहे.
लवकरात लवकर शासनाने लोखंडी पुल दुरूस्ती करावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. जेणेकरून दोन्ही वाड्या मध्ये पुन्हा संपर्क होईल.