• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, January 30, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • गावगाडा। Gavgaada
  • E-Peek Pahani 2022 |जामखेड तालुक्यातील 60 हजार खातेदारांची ई पिक पाहणी प्रलंबित, ई पिक पाहणी नोंद न झाल्यास भविष्यात निर्माण होणार अडचणी, शेतकरी बांधवांनी तातडीने ई पिक पाहणीची नोंद करून घ्यावी – योगेश चंद्रे

E-Peek Pahani 2022 |जामखेड तालुक्यातील 60 हजार खातेदारांची ई पिक पाहणी प्रलंबित, ई पिक पाहणी नोंद न झाल्यास भविष्यात निर्माण होणार अडचणी, शेतकरी बांधवांनी तातडीने ई पिक पाहणीची नोंद करून घ्यावी – योगेश चंद्रे

गावगाडा। Gavgaadaजामखेडमहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Sep 24, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। “माझी शेती माझा सातबारा – मीच लिहील माझा पीकपेरा” या धोरणानुसार जामखेड तालुक्यातील ६२ हजार २०० खातेदारांची पिक पाहणी नोंद प्रलंबित आहे. पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी तातडीने पिक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

E peek Pahani of 60 thousand account holders in Jamkhed taluka is pending, if the E peek Pahani is not registered problems will arise in the future, farmers should immediately register the E peek Pahani 2022 - Yogesh Chandre,
चर्चेतल्या बातम्या

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत…

Dec 29, 2025

“माझी शेती माझा सातबारा – मीच लिहील माझा पीकपेरा” या धोरणानुसार प्रत्येक खातेदाराने आपल्या शेतात केलेल्या पिकाचा पीकपेरा स्वतः नोंद करायचा आहे. सध्या खरीप हंगाम चालू आहे. सुधारित पिक पाहणी एपच्या (e-peek Pahani App) माध्यमांतून खरीप पिक पाहणी करण्याचे काम चालू आहे. परंतू जामखेड तालुक्यातील हजारो शेतकरी खातेदारांनी पिक पाहणीची नोंद केलेली नाही.

जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तलाठी यांच्या मार्फत पिक पाहणीबाबत प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. मार्गदर्शन कॅम्प घेतेलेले आहेत, तरीही पिक पाहणीच्या नोंदीबाबत खातेदारांची उदासीनता दिसून येत आहे.पिक पाहणी न झाल्यामुळे पिक विमा, खरेदी विक्री, नुकसान भरपाई अनुदान या शासनाच्या विविध योजनासाठी अडचणी येऊ शकतात.

सद्यपरिस्थितीत ऑनलाईन पीक पाहणी तलाठी यांना करता येत नाही त्यामुळे पिक पाहणी तलाठी करून घेतील या मानसिकतेत न राहता प्रत्येक खातेदार यांनी आपल्या पिकाचा पीकपेरा स्वतः करुन घेण्याची आवश्यकता आहे.पिक पाहणी करत असताना काही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या गावाच्या तलाठी यांच्याशी संपर्क करावा.

जामखेड तालुक्यातील ७१ हजार २०० खातेदार आहेत त्यापैकी फक्त ९ हजार खातेदारांनी पिक पाहणीची नोंद केली आहे. अजून ६२ हजार २०० खातेदारांची पिक पाहणी नोंद प्रलंबित आहे. पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे पिक विमा, खरेदी विक्री,नुकसान भरपाई अनुदान या शासनाच्या विविध योजनासाठी भविष्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी तातडीने पिक पाहणी करून घ्यावी, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

सर्व खातेदार यांना शासनाने आपल्या शेतातील पिक पेरा स्वतः नोंद करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा तालुक्यातील सर्व खातेदार यांनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपली पिक पाहणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

E peek Pahani of 60 thousand account holders in Jamkhed taluka is pendingfarmers should immediately register the E peek Pahani 2022 - Yogesh Chandreif the E peek Pahani is not registered problems will arise in the futureJamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest News
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कची लढाई कायदेशीररित्या कशी जिंकली? सविस्तर जाणून घ्या

Next Post

खाद्यतेलांचा वारंवार पुर्नवापर करताय ? मग कडक कारवाईस तयार रहा , अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरू

You might also like More from author
महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत शिंदेंना जिल्हा परिषदेत…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

महाराष्ट्र

जामखेड येथील बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना, बैलगाड्याच्या धडकेत अंकुश महाराज वाळके…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,300Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

जामखेड : गांजा तस्करीचा पर्दाफाश, साडेतीन लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या,…

Team jamkhedtimes.com Jan 29, 2026

ब्रेकिंग न्यूज : गावठी कट्ट्यासह संग्राम जगताप जेरबंद; एलसीबीच्या…

Jan 27, 2026

जामखेड: फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सुटचे वाटप, अजय सातव…

Jan 27, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित…

Jan 22, 2026
Prev Next 1 of 922
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा 01:24
  2. 2 जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर 01:21
  3. 3 Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news 01:09

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.