ब्रेकिंग न्यूज: पावसाने जामखेड तालुक्यात घेतला पहिला बळी, अंगावर भिंत पडल्याने वृध्द महिलेचा मृत्यू, पिंपळगाव उंडा येथील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात सतत पडणाऱ्या अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिलीय. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे आतोनात नुकसान झालेय.घरांच्या पडझडीच्या घटना वाढल्या आहेत.अश्याच एका घटनेत पावसाने तालुक्यात पहिला बळी घेतलाय.पिंपळगाव उंडा येथील एका वृध्द महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळण्याची घटना घडलीय.या घटनेत पारूबाई किसन गव्हाणे या वयोवृद्ध आज्जीचा मृत्यू झाला आहे.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील किसन गव्हाणे व पारूबाई गव्हाणे हे वृध्द पती-पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात झोपले होते. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घरावर शेजारील घराची भिंत कोसळली. या घटनेत ७५ वर्षीय पारूबाई गव्हाणे ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जामखेडच्या खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मध्यरात्री जामखेड ग्रामीण रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
बातमी अपडेट होत आहे..