Jamkhed Times News | हेड कॉन्स्टेबल बाप्पू गव्हाणे यांची नगर तालुका पोलिस स्टेशनला बदली

जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने देण्यात आला निरोप

 

Jamkhed Times News | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड  पोलिस स्टेशनला मागील आठ वर्षांपासून सेवेत असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबल बाप्पू गव्हाणे यांची नगर तालुका पोलिस स्टेशनला नुकतीच बदली झाली आहे. आज शनिवारी जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला.

Jamkhed Times News
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते हेड कॉन्स्टेबल बाप्पू गव्हाणे यांचा सन्मान करण्यात आला.

Jamkhed Times News | हेड कॉन्स्टेबल बाप्पू गव्हाणे यांनी आठ वर्षात जामखेड टाऊन व वाहतुक शाखेत काम केले.हसतमुख व सामाजिक व पोलीस स्टेशनच्या कामात ते सतत अग्रेसर होते. त्यांची नुकतीच नगर तालुका पोलिस स्टेशनला बदली झाली आहे. जामखेड पोलिस स्टेशनला बजावलेल्या सेवेबद्दल पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस परिवारातर्फे त्यांना  भावी वाटचालीसाठी आणि निरोगी आयष्यासाठी अश्रुपूर्ण शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.यावेळी गव्हाणे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला काम करत असताना आलेले अनुभव सांगून सर्वांचे आभार मानले.

Jamkhrd Times NEWS
हस्ते हेड कॉन्स्टेबल बाप्पू गव्हाणे यांना निरोप देताना पोलीस बांधव